"सोलापूर १९०३: प्लेगच्या सावटात डॉ. आर्ली आणि डॉ.सोनूबाईंच्या ख्रिसमसच्या आठवणी"
Jungle day's -1913 ( डॉ. आर्ली मुन्सन यांच्या 1913 साली प्रसिद्ध झालेल्या jungle days पुस्तकातील सोलापूर विषयी आठवणींचा संपादित अंश) जंगल डेज' (Jungle Days - १९१३) हे पुस्तक अमेरिकन महिला डॉक्टर डॉ. आर्ली मुन्सन (Dr. Arley Munson) यांनी लिहिले आहे. त्यांनी १९०३ च्या सुमारास भारतात वैद्यकीय सेवा दिली. या पुस्तकातील सोलापूर या प्रकरणात लेखिका व सोलापूरच्या त्यांच्या कॉलेज मैत्रीण असलेल्या डॉ. सोनुबाई या सुट्टीसाठी आमेरिकेहून भारतात परतल्या होत्या त्यावेळच सोलापूर शहराच 1903 सालंच वर्णन या पुस्तकात आले आहे. सोनूबाई या सोलापूरचे डॉ. प्रभाकरराव केसकर यांच्या कन्या होत्या आणि त्या बहुधा सोलापूरच्या पहिल्या महिला डॉक्टर असाव्यात. विशेष म्हणजे, डॉ. आनंदीबाई जोशी ज्या 'वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया' (अमेरिका) मध्ये शिकल्या, तिथेच सोनूबाई आणि लेखिका एकत्र शिकल्या होत्या. हे पुस्तक १९१३ मध्ये प्रकाशित झाले असले तरी, त्यातील घटना या १९०३ सालातील प्लेग आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या आहेत. प्रकरण १: बॉम्बे (मुंबई) "उद्या सकाळी बॉम्बे (मुंबई)!...