Posts

"सोलापूर १९०३: प्लेगच्या सावटात डॉ. आर्ली आणि डॉ.सोनूबाईंच्या ख्रिसमसच्या आठवणी"

Image
Jungle day's -1913  (  डॉ. आर्ली मुन्सन यांच्या 1913 साली प्रसिद्ध झालेल्या jungle days पुस्तकातील सोलापूर विषयी आठवणींचा संपादित अंश) जंगल डेज' (Jungle Days - १९१३) हे पुस्तक अमेरिकन महिला डॉक्टर डॉ. आर्ली मुन्सन (Dr. Arley Munson) यांनी लिहिले आहे. त्यांनी १९०३ च्या सुमारास भारतात वैद्यकीय सेवा दिली. या पुस्तकातील सोलापूर या प्रकरणात लेखिका व सोलापूरच्या त्यांच्या कॉलेज मैत्रीण असलेल्या डॉ. सोनुबाई या सुट्टीसाठी आमेरिकेहून भारतात परतल्या होत्या त्यावेळच सोलापूर शहराच 1903 सालंच वर्णन या पुस्तकात आले आहे.   सोनूबाई या सोलापूरचे डॉ. प्रभाकरराव केसकर यांच्या कन्या होत्या आणि त्या बहुधा सोलापूरच्या पहिल्या महिला डॉक्टर असाव्यात. विशेष म्हणजे, डॉ. आनंदीबाई जोशी ज्या 'वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया' (अमेरिका) मध्ये शिकल्या, तिथेच सोनूबाई आणि लेखिका एकत्र शिकल्या होत्या. हे पुस्तक १९१३ मध्ये प्रकाशित झाले असले तरी, त्यातील घटना या १९०३ सालातील प्लेग आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या आहेत. प्रकरण १: बॉम्बे (मुंबई) "उद्या सकाळी बॉम्बे (मुंबई)!...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सोलापूर दौरा- १९३१

Image
सोलापूरच्या इतिहासात काही दिवस सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे २६ डिसेंबर १९३१. या दिवशी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महानायक, आझाद हिंद फौजेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सोलापूरला भेट दिली होती.  सोलापूरनगरीत अभूतपूर्व स्वागत पुण्याहून निघालेली पॅसेंजर रेल्वे सायंकाळी ६ वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचली आणि वातावरण 'सुभाषबाबू की जय' च्या घोषणेने दुमदुमून गेले. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूरकरांनी केलेली तयारी पाहण्यासारखी होती. नव्या पेठेपासून बाजारपेठेपर्यंतचा रस्ता कमानी, तोरणे, पताका आणि दिव्यांच्या माळांनी सजवला होता. रस्त्यांवर सडा-रांगोळ्या घातल्या होत्या. विशेष म्हणजे, या स्वागताच्या कमानींवर सोलापूरच्या त्या चार हुतात्म्यांचे (नरवीरांचे) फोटो लावले होते, ज्यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. मिरवणुकीच्या वाटेवर नागरिकांनी नेताजींवर फुलांचा वर्षाव केला आणि अक्षता टाकल्या. रात्री साडेआठच्या सुमारास ही भव्य मिरवणूक शेठ गुलाबचंद यांच्या वाड्यापाशी विसावली.   जनसागरासमोर ऐतिहासिक भाषण त्यावेळच्या 'मजूर मैदानावर' (आजचे पा...

सोलापूर नगरपालिकेची स्थापना (१८५२) भाग -१

Image
हा लेख 'सोलापूर नगरपालिकेचा शतसांवत्सरिक ग्रंथ' या दुर्मिळ ऐतिहासिक पुस्तकावर आधारित आहे.   सोलापूर नगरपालिकेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ३ ऑगस्ट १९५३ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष स्व. आबासाहेब किल्लेदार यांच्या कार्यकाळात हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. सोलापूर शहराचा आणि स्थानिक प्रशासनाचा १८५० पासूनचा इतिहास समजून घेण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. सोलापूर नगरपालिकेचा इतिहास: स्थापना, पहिले मानकरी आणि प्रशासनाची सुरुवात १. नगरपालिकेच्या स्थापनेची गरज  ब्रिटीश राजवटीत अखिल हिंदुस्थानातील मोठ्या गावांमधील स्थानिक स्वरूपाची कामे स्थानिक कर बसवून पूर्ण करता यावीत आणि जिल्हाधिकाऱ्यांवरील (Collector) कामाचा ताण कमी व्हावा, या दुहेरी हेतूने नगरपालिकांची स्थापना करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. यासाठी १८५० साली कायदा मंजूर करण्यात आला. सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर Mr. इनव्हरारिटी यांनी २१-३-१८५१ रोजी शहराभोवतालच्या तटाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवताना, अशी कामे करण्यासाठी आणि शहराच्या देखभालीसाठी एक 'कमिटी' स्थाप...

सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णक्षण: पंडित जवाहरलाल नेहरूंचे दोन ऐतिहासिक दौरे (१९३१ आणि १९३७)

Image
  पंडित नेहरूजींचे दोन दौरे: सोलापूरच्या जनसागराचा स्वातंत्र्यलढ्यातील हुंकार. सोलापूर शहराचा इतिहास हा त्यागाचा आणि शौर्याचा इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या शहराने दिलेले योगदान अतुलनीय आहे. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, राष्ट्रनेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरला दिलेले दोन भेटी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. या दौऱ्यांनी सोलापूरकरांमध्ये नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध लढण्याचे बळ दिले. आज आपण 'सोलापूर समाचार' आणि 'द इंडियन एक्सप्रेस' मधील तत्कालीन वृत्तांतांच्या आधारे या दोन दौऱ्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. १. डिसेंबर १९३१ मध्ये सोलापूर एका कठीण प्रसंगातून जात होते. मार्शल लॉच्या छायेतून बाहेर पडत असलेल्या या शहराला धीर देण्यासाठी पंडितजी आले होते. टिळक चौकातील ऐतिहासिक सभा: नेहरूजी 20 डिसेंबर रोजी सोलापूर ला भेट देणार असल्याने त्यांना मानपत्र देण्यासाठी व सभेच्या नियोजनबद्ध आधी १९ डिसेंबर १९३१ रोजी टिळक चौकात एक विराट सभा पार पडली. या सभेचे अध्यक्षपद डॉ. वैशंपायन यांनी भूषविले होते. श्री. राजवाडे यांनी मांडलेला...

डॉ. ॲनी बेझंट यांचा सोलापूर दौरा (१९९६)

Image
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात १९१६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच काळात लोकमान्य टिळक आणि डॉ. ॲनी बेझंट यांनी 'होमरूल लीग'च्या माध्यमातून स्वराज्याची मागणी लावून धरली होती. या चळवळीचा प्रसार करण्यासाठी डॉ. ॲनी बेझंट यांनी देशभर दौरे केले. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून ९ मार्च १९१६ रोजी त्यांनी सोलापूर शहराला भेट दिली होती. तत्कालीन दस्तऐवजांच्या आधारे या भेटीचा घेतलेला हा आढावा. सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन ९ मार्च १९१६ रोजी डॉ. बेझंट यांचे सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहरातील तत्कालीन प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिलचे (जुनी गिरणी) मालक शेठ नरोत्तम मोरारजी गोकुळदास, प्रसिद्ध व्यापारी शेठ हिराचंद नेमचंद, सोलापूर नगरपालिकेचे तत्कालीन चीफ ऑफिसर आर. बी. पित्रे आणि शहराचे मॅजिस्ट्रेट यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्या सोलापूर मुक्कामाची व्यवस्था शेठ नरोत्तम मोरारजी यांच्या  निवासस्थानी करण्यात आली होती. ' रिपन हॉल' आणि नामदार गोखलेंच्या प्रतिमेचे अनावरण या भेटीती...

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories

Image
                    (Sir George Clarke Governor ) सोलापूर समाचार ता. ९ माहे जुलई सन १९१० ना० गव्हरनर साहेब यांचे आगमन पूर्वी ठरल्याप्रमाणें मुंबई इलाख्याचे नामदार गव्हरनर साहेबांची स्वारी सोलापुरास शनिवारी सकाळी मेलनें आली होती. त्यांचे स्वागतार्थ स्टेशनावर मुख्य सरकारी अधिकारी, म्यु. कौन्सिलर्स, डि. लो. बोर्डाचे मेंबर्स, श्री. राजेबहादूर नरसिंगगिरजी व गांवातील काही मंडळी गेली होती. स्टेशन प्लाटफार्म झाडांच्या कुंड्या व निशाणें वगैरेंनी सुशोभित केला होता. गाडी स्टेशनावर आल्याबरोबर मे. कलेक्टर साहेबांनी सामोरे होऊन     ना. साहेबांस उतरून घेतले. श्री. राजेबहादूर नरसिंगगिरजी महाराज, मे.जज्ज साहेब, हुजूर डे. कलेक्टर, डि. डे. कलेक्टर, मिलिटरी पेन्शनर्स व शेट नरोत्तमदास, रा. ब. साठे वगैरे लोकांच्या मुलाखती करविल्या. स्टेशनच्या बाहेर पोलिसांची सलामी घेऊन स्वारी मे. कलेक्टर साहेबांच्या बंगल्याकडे गेली. त्याच दिवशी सकाळी ११ वाजतां रिपनहॉलमध्ये ना. गव्हरनर साहेबांस म्युनिसिपालिटीकडून मानपत्र देण्यांत आलें. रिपनहॉलच्या गेटवर भव्य कमा...

सोलापूर समाचार (१९००): गिरी केस पार्ट - 2

Image
 आजच्या डिजिटल युगात सायबर क्राईम आणि ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या आपण रोज वाचतो. पण तुम्हाला माहित आहे का? १९०० च्या काळात, म्हणजे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी, जेव्हा इंटरनेट नव्हते, तेव्हाही लोकांची फसवणूक करण्यासाठी भामटे नवनवीन शक्कल लढवत असत. 'सोलापूर समाचार' या तत्कालीन वृत्तपत्रात (ऑगस्ट आणि ऑक्टोबर १९००) छापून आलेल्या काही बातम्यांवरून त्याकाळी सोलापूर आणि आसपासच्या भागात घडणाऱ्या गुन्ह्यांचा आणि 'स्कॅम'चा (Scam) उलगडा होतो. सोलापूर समाचारच्या 1900 च्या अंकातील दोन बातम्या १. भामट्यांची नवीन टोळी: देवाच्या नावाने आर्थिक फसवणूक ( गिरी केस) आज जसे लोक 'लॉटरी लागली आहे' किंवा 'स्वस्त कर्ज मिळेल' या आमिषाला बळी पडतात, तसाच प्रकार १९०० साली सुद्धा घडत होता. 'सोलापूर समाचार'मध्ये "भामट्यांची नवीन टोळी" या मथळ्याखाली एक सविस्तर बातमी छापली होती. स्कॅम (Scam) काय होता? काही लबाड लोक स्वतःला 'गिरीच्या व्यंकोबा' देवस्थानाचे गुमास्ते (प्रतिनिधी/मुनीम) म्हणून फिरत असत. त्यांचा दावा असे की, "देवाकडे भरपूर पैसा आणि सोने...