भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांचे पहिले सार्वजनिक कार्यक्रमातील गायन सोलापूरात.
भारतरत्न स्व .लता मंगेशकर यांची
सोलापूर संबधीत आठवण...
सोलापूर संबधीत आठवण...
( लता मंगेशकरांचा यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील पहिले गायन सोलापूरातील नूतन थिएटरमध्ये )
Lata Mangeshkar -in her own voice या पुस्तकातील मुलाखतीमधील प्रश्न
NMK: तुम्ही पहिल्यांदा लोकांसमोर (सार्वजनिकपणे) कधी सादरीकरण केले? तेव्हा तुम्ही किती वर्षांचे होता? ते कसे घडले?
लता मंगेशकर : ही गोष्ट आहे १९३० च्या दशकाच्या अखेरची. बाबांची नाटक कंपनी सोलापूरच्या दौऱ्यावर होती आणि एके दिवशी काही लोकांनी त्यांना एका संगीत कार्यक्रमात गाण्याची विनंती केली. मी त्यांचं बोलणं ऐकलं आणि विचारलं: ‘बाबा, मी पण तुमच्याबरोबर गाऊ का?’ ते हसून म्हणाले: ‘तू कशी गाणार?’ ‘का नाही? मला गाता येतं!’ मग ते म्हणाले: ‘कोणता राग गाणार?’ ‘खंबावती. आणि दोन गाणीसुद्धा.’ शेवटी ते मला स्टेजवर गाऊ द्यायला तयार झाले.
आमच्या नाटक कंपनीत एक हार्मोनियम वाजवणारे होते, ज्यांना आम्ही प्रेमाने बाबी ‘बोरकर’ म्हणायचो—इंग्रजी शब्द ‘बोर करणे’ (कंटाळा आणणे) यावरून—आणि एक तबलावादक, उस्ताद वल्या. मी काही दिवस सराव केला आणि त्यांनी मला साथसंगत केली.
तो संगीताचा कार्यक्रम सोलापूरच्या नूतन थिएटरमध्ये होता. बाबा स्टेजवर येण्यापूर्वी, मी राग खंबावती आणि त्यानंतर कृ. प्र. खाडिलकर यांच्या ‘मानापमान’ नाटकातील ‘शूरा मी वंदिले’ व प्रभाकर यांच्या ‘ब्रह्मकुमारी’ नाटकातील ‘सुहास्य तुझे मानसी मोही’ ही दोन मराठी गाणी गायले. त्यानंतर माझे बाबा रात्रभर गात होते. मला आठवतंय, बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून मी स्टेजवरच झोपी गेले होते. तो माझा पहिला जाहीर कार्यक्रम होता मी नऊ वर्षांची होते.
संकलन भाषांतर - atul deshpande
Comments
Post a Comment