स्वामीजींची भविष्यवाणी - 1926
स्वामीजींची मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली
स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी करण्याची एक विलक्षण कहाणी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील सोलापूर येथून समोर आली आहे बातमीतील दाव्यानुसार,
सोलापूरच्या मोती स्वामी, वय वर्षे ८० यांनी सहा महिन्यांपूर्वी भविष्यवाणी केली होती की , ते
१८ नोव्हेंबर रोजी ते निधन पावतील, असे म्हटले जाते
मृत्यूपूर्वी दोन दिवस आधीच त्यांनी आपल्या अनुयायांना आठवण करून दिली की त्यांच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे, तसेच त्यांच्या विनंतीवरून एक छायाचित्र (फोटो) घेण्यात आला .
( बातमी सोबत फोटो दिलेला नाही. )
मृत्यूच्या दिवशी त्यांनी सोलापूर शहर आणि छावणीत (कॅम्प) फिरून स्वतःच्या दफनासाठी पैसे गोळा केले, ते एका municipal councillor कडे जमा करुन स्वामी घरी गेले आणि योग मुद्रेत बसल्यानंतर त्यांनी आपले प्राण सोडले.
हि बातमी The Review-Advertiser (द रिव्ह्यू-अॅडव्हर्टायझर) या वर्तमानपत्रात छापून आली
प्रकाशन तारीख: शुक्रवार, १९ फेब्रुवारी, १९२६ (FRIDAY, FEBRUARY 19, 1926)
प्रकाशन स्थळ (संदर्भ): क्लॅरेशोल्म, अल्बर्टा (CLARESHOLM, ALBERTA).
हे कॅनडा देशातील अल्बर्टा प्रांतातील एक शहर आहे.
संकलन /भाषांतर
अतुल देशपांडे
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी ©
#solapurtales.
Comments
Post a Comment