सोलापूरच्या कल्याण मागाला रौप्य पदक -1921
REPORT ON
THE ALL-INDIA HANDWEAVING EXHIBITION,
PATNA, 1921.
"विणकाम प्रदर्शनातील सोलापूरचा ठसा - कल्याण माग"
टॅपेटच्या साहाय्याने साड्यांच्या काठांवर नक्षी विणण्याची पद्धत अतिशय लक्षवेधी होती. यातील काठांच्या फण्यांची रचना अशाप्रकारे केली होती की, ज्यामुळे साडीच्या मुख्य भागावर चौकटी विणणारा रंगीत धागा रेशमाच्या लाल काठांपासून वेगळा राहत असे.
या प्रदर्शनात सोलापूरचे श्री. टिकेकर यांनी आपले कौशल्य सादर केले. त्यांनी स्वतः तयार केलेले धागा गुंडाळण्याचे व पिळण्याचे यंत्र, एक 'कल्याण' नावाचा स्वयंचलित माग आणि फ्लाय शटल स्लेच्या मदतीने चालणारा दख्खनी साड्यांसाठीचा एक खड्डा माग ( pit loom ) प्रदर्शित केला होता.
याच प्रदर्शनात, बंगाल सरकारने देऊ केलेले सर्वोत्कृष्ट स्वयंचलित मागासाठीचे १०० रुपयांचे बक्षीस कोणालाही दिले गेले नाही, परंतु श्री. टिकेकर आणि कलकत्त्याच्या मेसर्स बेरी अँड कंपनीला त्यांच्या मागांसाठी रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे, विणकामाच्या उपकरणांच्या सर्वोत्कृष्ट खाजगी प्रदर्शनासाठी असलेले खास सुवर्णपदकसुद्धा सोलापूरच्या (बॉम्बे) श्री. टिकेकर यांनीच पटकावले.
संकलन / भाषांतर
अतुल देशपांडे
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी
#solapurtales.
Comments
Post a Comment