सोलापूर आणि पतंगाचे संदर्भ

पतंगाचा नायलॉन मांजा विमानाच्या पंख्यात अडकला परंतु सुदैवाने दुर्घटना टळली 06/01/2025 सोलापूर च्या वर्तमानपतत्रात एका घटनेबाबत ची नुकतीच छापून आलेली बातमी .
(हि वरील बातमी व लेखात वेध घेतलेल्या ऐतिहासिक घटना यांची कोणतीही तुलना करणे हा लेखाचा उद्देश नाही परंतु पतंगाचे सोलापूर च्या इतिहासाचा वेध घेतना काही संदर्भ हाती आले व ते महत्त्वाचे असल्याने या पतंगाच्या संदर्भातील बातमीच्या निमित्ताने नोंदवले आहेत .)
संदर्भ क्रमांक 1
सोलापूर च्या देशभक्त क्रांतिकारकांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशी दिल्यानंर देशभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने झाली यासंदर्भातील बातमी 7 Feb 1931 रोजी The illustrated London या वर्तमानपत्रात छापून आली 
यामधील एक बातमी हि मुंबईतील शहरात करण्यात आलेल्या निदर्शनाची व आंदोलकांनवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज च्या आहे.
मुंबई मधे निदर्शने झाली त्याच बातमीच्या शेजारी आहमदाबाद येथील विदेशी वस्तुच्या केलेल्या होळीचा व त्यामधे शालेय मुलांनीही सहभाग नोंदवल्याचा फोटोसहीत वेध घेण्यात आला आहे .
आहमदाबाद येथील शालेय मुलांनी ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून विदेशी खेळणी व पतंगांची होळी केली होती त्याचे फोटो बातमीसोबत देण्यात आले आहेत.           
        (आहमदाबाद येथे विदेशी खेळणी व पतंगाची                                केलेली होळी)
संदर्भ क्रमांक 2
 20.10.1942 रोजी सोलापूर च्या मल्लिकार्जुन मंदिरावर पतंग उडवणार्या मुलांना सापडलेला बॉम्ब व तो हाताळताना ओढावलेल्या दुर्दैवी मृत्युचा एक संदर्भ  ज्याला 1942 च्या चले जाव आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. या काळात सोलापूर मधील जहाल क्रांतिकारकांनी सोलापूर मधे ठिकठिकाणी बॉम्बस्फोट केले होते व ब्रिटिशांच्या दडपशाही चा निषेध नोंदवला होता अशाच एका घटनेत क्रांतिकारकांनी लपवून ठेवलेला एक बॉम्ब मल्लिकार्जुंन मंदिरावर पतंग उडवणार्या मुलांच्या हातात लागला व तो हाताळताना खाली पडला व फुटला त्यात हि मुलं दुर्दैवाने जखमी व नंतर त्यातील एका मुलाचा दुर्दैवाने मृत्यू झाला अशी ही पतंग उडवताना घडलेली दुर्दैवी घटना ज्याला सोलापूर च्या स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ आहे.
सदर घटनेचा संदर्भ खाली जोडला आहे.
संकलन /भाषांतर
अतुल देशपांडे
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी
#solapurtales. 

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories