मोटार नोंदी - सोलापूर (1924)
मोटार नोंदी आणि बातम्या (Motor Notes and News) या सदराखाली देण्यात आला होता.
२०-एच.पी. रोल्स-रॉयस कार चे बॉम्बे (मुंबई) आणि सिकंदराबाद दरम्यानच्या रस्त्यावर. ज्या वेळी हे छायाचित्र काढले गेले, तेव्हा चालकाने नुकतीच एका काळविटाची (buck) शिकार केली होती, जी तो दुपारच्या जेवणासाठी सोलापूरला (Sholapur) घेऊन जात होता, कारण ताजे अन्न मिळणे तिथे कधीकधी थोडे कठीण असते.छायाचित्रातील 'बीन' (Bean) कार टांगानिका (Tanganyika) आफ्रिका येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे संचालक मेजर सेलँडर (Major Selander) यांची आहे. मेजर सेलँडर यांनी ही कार फेब्रुवारी १९२४ मध्ये खरेदी केली आणि त्या देशात काही महिने चालवली, त्यानंतर जुलै १९२४ मध्ये ती त्यांच्याकडे जहाजाने पाठवण्यात आली( भारतात)
छायाचित्र पाठवताना, मेजर सेलँडर लिहितात,
'मी माझ्या कारचे आणखी एक छायाचित्र सोबत जोडले आहे, जे नैऋत्य (S.W.) जिल्ह्यातील सोनगिया (Songea) जवळ, रेल्वेपासून सुमारे ५०० मैल अंतरावर घेतले आहे. तो पूल एका खोल दरीवरील लाकडी रचना आहे. तो एका तीव्र वळणावर आहे. मागची टेकडी १:४ (1 in 4) च्या चढणीची आहे आणि समोर दुसरी १:५ (1 in 5) ची आहे. माझ्या गेल्या दौऱ्यात अशा अनेक विपरीत परिस्थिती होत्या आणि कारने त्या अतिशय समाधानकारकपणे हाताळल्या या बद्दल ते समाधान व्यक्त करतात.
संकलन / भाषांतर
अतुल देशपांडे
सोलापूर चा इतिहास आणि आठवणी ©
#solapurtales
Comments
Post a Comment