गिरी केस - सोलापूर
व्यावसायिक विषप्रयोग करणारे (Professional Poisoners) गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या दप्तरी (रेकॉर्डमध्ये) नोंद झालेल्या काही विचित्र गुन्ह्यांपैकी, सातारा जिल्ह्यातील दोन आणि सोलापूरमधील (Sholapur) चार गुन्हे हे "गिरी" प्रकरणे (Giri cases) म्हणून ओळखले जातात. व्यावसायिक विषप्रयोग करणाऱ्या गुन्हेगारांच्या एका टोळीने, आपण 'गिरी' मंदिराच्या व्यवस्थापकांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून, श्रीमंत व सुस्थितीतील लोकांना मंदिराच्या निधीतून मोठे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी अशी अट घातली की, कर्ज मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने, व्यवहारातील प्रामाणिकपणाची हमी म्हणून मंदिर संस्थेकडे ठराविक रक्कम 'बयाणा' ( इसारा) म्हणून जमा करावी. फसगत झालेले हे लोक आवश्यक ती रोकड घेऊन घरातून निघाले आणि या तोतया "गिरी" एजंटांसोबत काही अंतर प्रवास केला. त्यानंतर एका सोयीस्कर ठिकाणी, या एजंटांनी आपल्या बळींना (पीडितांना) विष दिले आणि त्यांच्याकडील रोकड घेऊन पोबारा केला (पळून गेले). या घटनेचे साल निश्चितपणे दिलेले नाही 1900 ते 1910 दरम्यान असावे. संकलन / भाषांतर अ...